स्वातीताईंना निवडून आणण्यासाठी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करावे काँग्रेस महासचिव मुकुल वासनिक...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले असून आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वातीताईला आमदार करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे असे आव्हान काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी केले आहे...स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, वरवट, पातुर्डा येथे सलग तिसऱ्या दिवशी कार्यकर्ता बैठकीत त्यांनी सांगितले की, जो आपला मतदार आहे त्याला टिकून ठेवा, विजय आपला नक्कीच ठरलेला आहे... महाविकास आघाडीचे सरकार आलं तर आपण महिलांना दर म्हणाला तीन हजार रुपये देऊ हे तुम्ही मतदारात व महिलांमध्ये जाऊन सांगा. विजयाचे सूक्ष्म नियोजन मुकुल वाचणे करत असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. स्वातीताई आमदार झाल्या आणि निवडून आल्या तर या मतदारसंघात नक्कीच चांगलं काम करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.आपल्या मतदारसंघात सामाजिक वातावरण खराब करून स्वतःची पोळी शेकणाऱ्यांना जनता धडा शिकवल्यावर राहणार नाही असे आव्हान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचीटनीस प्रसेनजीतदादा पाटील यांनी केले.यावेळी महाविकास आघाडीतील प्रकाश पाटील, विजय अंभोरे,प्रसेनजीत पाटील, दत्ता पाटील,संगीतराव भोंगळ, डॉ संदीप वाकेकर,गजानन वाघ यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
