पुढील पाच वर्षात जळगाव जामोद मतदारसंघात घडून येणार औद्योगिक क्रांती....विकासाची गती वाढविण्यासाठी डॉ.संजय कुटे यांना निवडून आणा..आमदार अर्चनादीदी चिटणीस...


 
पुढील पाच वर्षात जळगाव जामोद मतदारसंघात घडून येणार औद्योगिक क्रांती....विकासाची गती वाढविण्यासाठी डॉ.संजय कुटे यांना निवडून आणा..आमदार अर्चनादीदी चिटणीस...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जळगाव जामोद मतदारसंघ विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे..सोनाळा येथील जाहीर सभेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी विरोधकांवर साधला निशाणा...मागील वीस वर्षात सर्वांना सोबत घेऊन विकास साधत भेदभावरहित मतदार संघ बनविला जातीपातीला सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास साधत रस्ते,पाणी,विज,सिंचन अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या.महत्वकांक्षी चो॔ढी प्रकल्प पूर्ण झाला असून उर्वरित प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत,त्यामुळेच हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची असून पुढील पाच वर्षात औद्योगिक क्रांती घडवण्याचे वचन महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी सोनाळा येथील सभेत दिले...भाजपा महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांची बरोबरी विरोधक कधीही करू शकणार नाहीत. महाविकास आघाडी आज विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे एकही विकास काम नाही किंवा भविष्याचे व्हिजन नाही.आज संपूर्ण महाराष्ट्र प्रगतीच्या पथावर  मोठ्या वेगाने अग्रेसर होत आहे. त्याच धर्तीवर आपला जळगाव जामोद मतदारसंघ देखील विकासाच्या वाटेने पुढे जात आहे.आज मतदारसंघांमध्ये पायाभूत सुविधांचा झालेल्या विकास हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक झालेला विकास आहे. शेतकरी बांधवांना मिळालेला कोट्यावधी रुपयाचा लाभ, लाडकी बहीण योजनेमध्ये निवड झालेल्या आपल्या लाखो माता-भगिनी, युवकांसाठी निर्माण झालेल्या विविध संधी, चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षणाचा सुधारलेला दर्जा अशा कित्येक गोष्टी मतदारसंघात झाल्या आहेत. तरी देखील विरोधक जाणून बुजून या मतदारसंघात काही झालेच नाही असा भ्रम नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप डाॅ संजय कुटे यांनी यावेळी केला.यावेळी विकासाला साथ देत आपण संजू भाऊ यांना निवडून आणले पाहिजे असे मत आमदार अर्चना चिटणीस यांनी व्यक्त केले.डाॅ गणेश दातीर, शांताराम दाणे,राजेंद्र ठाकरे,रंगराव देशमुख, किशोर केला आदीनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.यावेळी ज्ञानेश्वर पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते ओंकारदास राठी रिपाई तालुका अध्यक्ष बाबुलाल इंगळे, वामनराव खाळपे, राजु कोठारी, शिवसेना तालुकाप्रमुख केशव ढोकणे, भाजपा महिला तालुका अध्यक्ष गीताबाई लव्हाळे,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शारदा पाटील,आदीसह भाजपा महायुतीचे नेते, पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post Next Post