बोडखा गावात आ डॉ.संजय कुटे यांना विजयी करण्याचा निर्धार...


 
बोडखा गावात आ डॉ.संजय कुटे यांना विजयी करण्याचा निर्धार...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा जनसंवाद दौरा संपन्न झाला.दौऱ्यापूर्वी आ डॉ.संजय  कुटे येणार म्हणून महिलांनी आपापल्या घरासमोर कमी चिन्ह असेल्या आकर्षक रांगोळ्या काढून ठेवल्या होत्या,गावकर्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.गावासह परिसरात विकास केला.रस्ते,पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली,गावोगावी नळयोजना आली.यामुळेच विकासासाठी पाचव्यांदा आ डॉ.संजय कुटे यांच्याच पाठीशी खंबीरपणे असल्याचे बोडखावासियांनी सांगितले.

● संग्रामपूरातही नागरिकांनी बांधली आ डॉ.संजय कुटे यांच्या विजयाची खूणगाठ, ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत...विद्यार्थिनींसाठी महायुतीचे सरकारने मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असून आ डॉ.संजय कुटे यांनी या कामी प्रयत्न पाठपुरावा केला.याबद्दल विद्यार्थीनी एकत्रित येवून आ डॉ.संजय कुटे यांच्यावर पुष्पवृष्टी करत कृतज्ञतापूर्वक स्वागत केले.बोडखा वासीयांच्या उत्साही भेटीनंतर महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे जनसंवाद दौरा  तामगाव येथे पोहोचला. तामगावकरांनी व विशेषता विद्यार्थिनींनी फुलांच्या वर्षावात आणि ढोल ताशाच्या गजरात विजयासाठी आशीर्वाद देत  आ डॉ.संजय कुटे यांचे स्वागत केले. गावफेरी दरम्यान नागरिकांनी घेतलेला सहभाग प्रत्येकाचा उत्साह वाढवणारा होता. जळगाव जामोद मतदारसंघाचा विकास हा आपल्या सर्वांच्या ऐकीमुळे झाला आहे. आपण सर्वांनी आपली शक्ती माझ्या पाठीशी उभी केल्यामुळे मला आपले नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तुमच्या विश्वासामुळे सतत काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यामुळेच मोठमोठे विकासकामे पूर्ण होऊ शकले. आगामी काळ आपल्या सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण असून विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत आशीर्वाद दिला.हाच आशिर्वाद येत्या २० तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून द्या, असे आवाहन आ डॉ.संजय कुटे यांनी केले.यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Previous Post Next Post