मोताळा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्रीताई शेळके यांच्या प्रचाराला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद...


मोताळा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्रीताई शेळके यांच्या प्रचाराला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ जयश्रीताई शेळके यांचा आज दिनांक ६/११/२४ रोजी मोताळा तालुक्यातील गावात प्रचार दौरा संपन्न झाला. खांडवा, बाम्हंदा,  किन्होळा, थड, रोहिणखेड, सोनबरड या गावातील प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांशी संवाद साधुन मशाल या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला - भगिनी तसेच उपरोक्त गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post