आ डाॅ संजय कुटे यांच्या विजयासाठी सौभाग्यवतीची प्रचारात आघाडी...सर्कलनिहाय गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी साधला संवाद..


 
आ डाॅ संजय कुटे यांच्या विजयासाठी सौभाग्यवतीची प्रचारात आघाडी...सर्कलनिहाय गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी साधला संवाद..

आर सी २४ न्युज नेटवर्क....

जळगाव जामोद विधानसभा निवडणुकीत भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय आठवले गट,पिरिपा,रयत क्रांती संघटना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय श्रीराम कुटे यांच्या विजयासाठी सौभाग्यवती डाॅ अपर्णाताई कुटे यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.अगोदर शेगावमध्ये महिलांच्या काॅर्नर बैठकी घेतल्या,शेगाव मधील काॅर्नर बैठकींना चांगला प्रतिसाद मिळाला.आता संग्रामपूर व जळगाव जा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कलनिहाय गावोगावी प्रचार दौरा करत आहेत.खेड्यात घरोघरी जावून ग्रामस्थांशी संवाद आहेत.प्रचाराचा पहिला टप्पा तिन्ही तालुक्यात पूर्ण केला आहे.जळगाव जामोद मतदार संघात सुरू असलेली विकासकामे आगामी काळात अधिक गतिमान करण्यासाठी, समृद्ध जळगाव जामोद मतदार संघाचे स्वप्न पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी व कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे असे डाॅ अपर्णाताई कुटे यांनी आवाहन केले.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सौ.अपर्णा संजय कुटे यांचा जनसंवाद दौरा सुरू असून मतदारांकडून मिळत असलेला पाठिंबा आणि विश्वास मनाला नवी उभारी देणारा आहे.महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात विकासाची गती वाढली आहे. मजबूत रस्ते, शाश्वत विकास, पाणीपुरवठा योजना तसेच इतर सरकारी योजनांमुळे अनेक क्षेत्रांत बदल घडविला. विकासाचा हा प्रवास अविरत सुरू ठेवण्यासाठी महायुतीलाच समर्थ साथ देण्याचे आवाहन यावेळी सौ.अपर्णा कुटे यांनी मतदारांना केले.यामध्ये जळगाव जा तालुक्यातील मौजे काजेगाव- बोराळा बु,- बोराळा खुर्द,वडगाव गड या गावांमध्ये जनसंवाद दौरा केला.या जनसंवाद दौऱ्यात डाॅ अपर्णाताई संजय कुटे यांचे समवेत लाडक्या बहिणीसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post