उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.. उद्या होणार नऊ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला... पोलिसांचाही चोख बंदोबस्त...


 
उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.. उद्या होणार नऊ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला... पोलिसांचाही चोख बंदोबस्त...

अनिल भगत/आर सी २४ न्युज नेटवर्क...

२० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जळगाव जामोद विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी लागणार असून. उद्या सकाळीच आठ वाजेपासून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून जळगाव जामोद येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने मतमोजणी केंद्रावर १४ टेबल व्दारे २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून. प्रत्येक टेबलवर एक कोतवाल मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश काळे यांनी आर सी २४ न्यूज नेटवर्कची बोलताना दिली. या मतमोजणी वेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस फाटा या ठिकाणी लावण्यात आला आहे. जळगाव जामोद मतदारसंघात ३१७  मतदान केंद्रावर मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे मतपेटीत बंद उमेदवारांचे भविष्य यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जळगाव जामोद मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात ९ उमेदवार होते. वीस तारखेला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये २ लाख २५ हजार ३२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जळगाव जामोद मतदारसंघात मतदारावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यामुळेच मतदार संघात सरासरी ७३.५४% एवढे मोठे मतदान झाले होते. यावेळी मतमोजणी केंद्राच्या आढाव्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी भेट देऊन केंद्राचा आढावा घेतला व या संबंधित पोलिसांना सूचना दिल्या.मतदान मोजणी कक्षा बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. तसेच मतदार मोजणी केंद्राच्या बाहेरच पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली असून त्या ठिकाणाहून पत्रकारांना  माहिती पुरविण्यात येणार आहे.

Previous Post Next Post