पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक...


 
पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

भाजपा नेते आ डॉ.संजयभाऊ कुटे हे स्वतः पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.मतदार संघात कुठल्याही बड्या नेत्याची सभा घेतली नाही.स्वतःच प्रचाराची धुरा सांभाळून स्वतःसह पश्चिम वर्हाडातील महायुतीच्या उमेदवारांनाही निवडून आणले.पश्चिम वर्हाडात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सुक्ष्म नियोजन  केले.व पश्चिम वर्हाडातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला.आज भाजपचे दिग्गज नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून सलग ५ वा विजय मिळवल्याबद्दल यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या.महायुती सरकारने राज्यात केलेली लोककल्याणकारी विकासकामे आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या समर्थ नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे यश आहे.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी केलेल्या कष्टातून हे यश मिळाले आहे. महायुती सरकारने आणलेल्या 'लाडकी बहीण'सारख्या अनेक जनहिताच्या योजनांना पाठींबा देत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केले, यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभारही यावेळी महायुतीच्या वतीने पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले डाॅ संजय कुटे यांनी मानले.यावेळी आ डॉ.संजय कुटे यांचे स्वीय सहायक निलेश शर्मा पण सोबत होते.

Previous Post Next Post