कृषी विभागाच्या सहकार्याने सुनगावात श्रमदान करून बनविला वनराई बंधारा...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील गावनदीवर कृषी विभाग व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यात वाहणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी हा होणारा बंधारा उभारण्यात आला आहे यामुळे सुनगाव येथील या परिसरातील भूजल पाणी पातळी वाढेल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या तुटवड्याचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतो या भागासाठी हा वनराई बंधारा एक वरदान ठरणार आहे. कृषी विभाग व सुनगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने सदर बंधारा उभारण्यात येथील नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ग्रामपंचायत ने साधनसामग्री उपलब्ध करून देऊन आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनात हा वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे निसर्ग संवर्धन आणि जलसंधारणाचे महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनाचे चालना मिळणार पाण्याचा साठा टिकवल्यामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढेल आणि निसर्ग संतुलन मदत होईल तसेच गुराढोरांनाही पाणी मिळेल. सदर बंधारा उभारण्यासाठी तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांच्या मार्गदर्शनात कृषी सहाय्यक एस जे गव्हाणे, व्ही.जी काळे, एस एस शेळके, सुनगाव कृषी मित्र मोहन सिंह राजपूत, गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, संतोष कपले, चैतन्य राजपूत, अनिकेत कोथळकार, गौरव नानकदे, ग्रामपंचायतचे कर्मचारी सुरेश मिरटकार यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिकांनी हा वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले...
________________________
--प्रतिक्रिया--
ग्रामस्थांचे पुढाकारामुळे हा वनराई बंधारा एकत्रित प्रयत्नामुळे यशस्वी झाला. हा बंधारा गावच्या जलसंधारणासाठी एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे आणि भविष्यात दुष्काळाचा सामना करण्यास मदत होईल...
पांडुरंग इंगळे..
शेतकरी सुनगांव....
_________________________
अधिकारी आणि लोकप्रतिनिधीचे तसेच गावकऱ्यांचे अभिनंदन या यशस्वी उपक्रमासाठी सर्वांनी वनराई बंधारा उभारण्यासाठी श्रमदानातून सहकार्य केले. निसर्ग संवर्धन आणि जलसंधारणाचे महत्त्व या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन असे चालना मिळणार आहे पाण्याचा साठा टिकवण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त आहेत तसेच परिसरातील हरी शेत्र वाटेल आणि निसर्ग संतुलनास मदत होईल...
मोहनसिंह राजपूत...
कृषी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते सुनगाव....
