जनसंवाद सभेत विकास कामांची होत आहे चर्चा..खेर्डा बु.सभेला भरगच्च गर्दीने नवचैतन्य निर्माण झाले..मतदारांच्या भरघोस पाठिंब्यामुळेच आ डॉ.संजय कुटे यांचा विजय निश्चित...!


 
जनसंवाद सभेत विकास कामांची होत आहे चर्चा..खेर्डा बु.सभेला भरगच्च गर्दीने नवचैतन्य निर्माण झाले..मतदारांच्या भरघोस पाठिंब्यामुळेच आ डॉ.संजय कुटे यांचा विजय निश्चित...!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

खेर्डा बु येथे वडशिंगी जि.प. सर्कलच्या जनसंवाद सभेला डॉ.संजय कुटे यांनी संबोधित केले. बहुसंख्य बंधू-भगिनींनी सभेला लावलेली उपस्थिती हे जळगाव जामोद मतदारसंघाच्या विकासाबद्दल असलेली प्रतिबद्धता, एकता आणि भाजपा-महायुतीवर असलेल्या त्यांच्या दृढ विश्वासाची ग्वाही देत होती. सर्वांच्या उत्साही सहभागामुळे सभेत एक नवचैतन्य निर्माण झाले होते.वडशिंगी जि.प. सर्कलमध्ये विविध विकास कामे पार पडली असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. आपल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतून घराघरातील महिला भगिनींना आर्थिक पाठबळ दिले आहे. ज्याचा थेट हातभार त्यांच्या संसाराला लागत आहे.त्यामुळे विकास साधायचा असेल तर महायुती हाच पर्याय आहे.येत्या २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांनी सर्वांना केले. सभेला  महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post