जामोद येथील जाहिर सभेत विजयी भवः च्या घोषणा देत संजूभाऊला साथ.महिलांना पुढील महिन्यापासून 2100 रू मिळणार.जामोद व सोनाळा येथे रेल्वे स्टेशन होणार असून परिसरातील नागरिकांना सुविधा मिळणार.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जामोद येथे भाजपा शिवसेना ,राकाॅ,रिपाई, पिरिपा,रयत क्रांती संघटना,लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जनसंवाद सभा संपन्न झाली.सुरूवातीला राजेंद्र गांधी प्रास्ताविकातून आ डॉ.संजय कुटे यांनी परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती देवून विकासाला साथ देण्याचे आवाहन केले.तर मतदार संघातील प्रत्येक समाज घटकाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आ डॉ.संजय कुटे सातत्याने प्रयत्नरत आहेत,शेतकर्यांसाठी सर्वाधिक पिक विमा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविला,रस्ते विज,पाणी,पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे सांगून आ डॉ.संजय कुटे यांच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी मनोगतातून केले.जळगाव जामोद मतदारसंघातील विकासावर आधारित आगामी पाच वर्षांच्या मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर ठेवले.जळगाव मतदारसंघाच्या विकासामध्ये जामोद जि.प. सर्कलमधील जनतेचा कायमच सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आपण सर्वांनी मला कायमच भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या विकासामध्ये कधीही निधीची कमतरता पडू दिलेली नाही आणि भविष्यात देखील पडू देणार नाही. यंदाची ही निवडणूक एका पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी नव्हे तर आपल्या मतदारसंघासह संपूर्ण राज्यासाठीच महत्त्वपूर्ण आहे.असल्याचे आ डॉ.संजय कुटे यांनी आवर्जुन सांगितले.निवडणूक आपल्या सर्वांच्या येणाऱ्या पुढील पाच वर्षांच्या भविष्याच्याबरोबरच गेल्या दोन दशकभरात मतदारसंघाने केलेल्या नेत्र दीपक प्रगतीचे देखील भविष्य ती ठरवणार आहे. कारण यावेळी मतदारसंघाला रसातळाला घेऊन जाणारी विचारधारा मतदारसंघात प्रभावी होऊ पाहत आहे. आपण सर्वजणच या गोष्टीपासून अवगत असून हे येत्या २० तारखेला या वाईट वृत्तीला रोखण्यासाठी मोठ्या संख्येने भाजपा महायुतीला मतदान करावे, असे आवाहनही डाॅ संजय कुटे यांनी सर्वांना केले.
