३५वर्षिय शेतमजुराची गळफास लावून आत्महत्या...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम खेर्डा येथील ३५ वर्षिय विवाहित शेतमजूर इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली... सविस्तर असे की ग्राम खेर्डा बु! येथील पवन समाधान वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की माझा भाऊ प्रमोद उर्फ परमेश्वर समाधान वानखडे यांनी राहते घरामध्ये रात्री दारुच्या नशेमध्ये घराच्या छताच्या लोखंडी पाईपला साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अश्या फिर्यादीचे तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग नं ९३/२०२४ कलम १९४ भारतीय न्याय संहिते नुसार दाखल करण्यात आला.. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता.शवविच्छेदन करून मृतक प्रमोद वानखडे याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचे पश्चात आई, पत्नी,५ वर्षाचा मुलगा,७ वर्षांची मुलगी, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भागवत उबरहंडे करीत आहेत.