काँग्रेस, राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार पक्ष)मित्रपक्ष असावा तर या सारखा..'जयश्री ताईंसाठी' निवडणूक लढताहेत काँग्रेस, राष्ट्रवादी.. तेही पूर्ण ताकदीने!


 
काँग्रेस, राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार पक्ष)मित्रपक्ष असावा तर या सारखा..'जयश्री ताईंसाठी' निवडणूक लढताहेत काँग्रेस, राष्ट्रवादी.. तेही पूर्ण ताकदीने!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सध्या पाठीशी उभे राहिलेल्या खंबीर मित्र पक्षाचीच चर्चा आहे. जयश्रीताई शेळके उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने कडून निवडणूक लढवीत आहे. मात्र त्यांचे मित्र पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद चंद्र पवार ) दोघेही ज्या ताकतीने निवडणुकीत उतरले आहे ते पाहता मित्र असावे तर असे असे गौरवाने बोलले जाते.एकीकडे मित्र पक्षांचे खच्चीकरण करून अपक्षांना खतपाणी घातले गेले आहे.  मित्र पक्षांची अडवणूक करून त्यांचे चिन्हही बाजूला करीत उमेदवार आपल्या चिन्हावर उभे करण्याचा खोडसाळपणा महाराष्ट्र पाहत आहे. ज्यां मित्र पक्षाच्या बळावर महाराष्ट्रात मोठे झाले त्यांचेच पक्ष फोडले. त्यांचे चिन्हही काढून घेतले असे चित्र असताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मात्र सुखद चित्र आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके निवडणुकीसाठी उभ्या आहे. परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या डोक्यावर घेतलीय ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने. या पक्षाचे नेते झोकुन देऊन प्रचारात उतरलेत.परवा काँग्रेसचे दिल्लीतील मोठे नेते मुकुल वासनिक जिल्ह्यात येऊन गेले. यावेळी त्यांनी चिखली मध्ये राहुल बोंद्रे यांच्या प्रचाराचे रणसिंग फुंकले.मात्र बुलढाणा विधानसभेमध्ये जयश्रीताई यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.केवळ दाखावू आवाहनच केले नाही तर आपली संपूर्ण टीम त्यांनी कामाला लावल्याचे चित्र आहे. बुलढाणा मतदार संघात काँग्रेस बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे.काँग्रेसला मानणारा वर्ग 'गठ्ठा मतदान ' असेच आहे. या ठिकाणी काँग्रेस कडून कुठलीही बंडखोरी नाही. वास्तविक येथे बंडखोरीची शक्यता अधिक होती.  आपल्या सहकार्याला बळ देण्याची भूमिका घेतल्या गेली आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी तिकीट मागितले परंतु ते न मिळाल्याने नाराजी व्यक्त न करता त्यांनी प्रचारात आघाडी घेतलीय.  शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी केलेला आक्रमक भाषण, आमदार धीरज लिंगाडे यांनी देखील या निवडणुकीमध्ये झोकून दिले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गणेशराव पाटील, विजय अंभोरे, धुरपतराव सावळे एकूण झाडून सारी काँग्रेस कामाला लागली असे चित्र आहे. जिल्हा काँग्रेसची सरचिटणीस सुनील सपकाळ यांनी तर उधडे घेतले आहे. नियोजन आयोजनाची बौद्धिक काम सपकाळ गुरुजी सांभाळत आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके व त्यांचे सहकारी हे देखील झोकून देऊन प्रचारात आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली परंतु ती त्यांना देण्यात आली नाही.मात्र कुठलीही खंत न बाळगता* *बुधवत ,नरुभाऊ खेडेकर आणि एकूणच शिवसैनिक सुद्धा ताकदीने भिडले आहे.त्यामुळे जयश्रीताई शेळके यांना मैदान मारणारे सहकारी मिळाले आहे. बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्र पक्षांच्या उमेदवारा विरोधात उमेदवार उभे करून त्यांना बळ दिल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातही एक-दोन ठिकाणी तसे उमेदवार असल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसने ज्या पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांना बळ देण्याची भूमिका घेतली ती निश्चितच कौतुकास्पद व बदल घडवणारी ठरू शकते.काँग्रेस राष्ट्रवादीच्या जोरकस प्रचारामुळे विरोधकांची हवा गुल झाली असून जयश्रीताई यांच्या विजयाचा मार्ग देखील  प्रशस्त झाला आहे.

Previous Post Next Post