बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जळगाव जामोद मतदारसंघातील चोंढी प्रकल्प पूर्ण झाला,आता अरकचेरी,हे प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत,जिगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेचे काम वेगाने सुरू असून येत्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतावर पाणी पोहचवणार आहे,यामुळे 44 हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येवून शेतकरी समृध्द होणार असल्याचे महायुतीचे उमेदवार डाॅ संजय कुटे यांनी सांगितले.भाजपा शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई आठवले गट,पिरिपा,रयत क्रांती संघटना,लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय श्रीराम कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे भव्य जाहीर सभा आयोजित केली होती.जात-पातीच्या राजकारणाला थारा न देता मतदारांनी विकास कामांना पसंती देत संजूभाऊ कुटे यांच्या हाकेला साद दिली.मध्यप्रदेश सरकारमधील माजी मंत्री तथा आमदार अर्चनादीदी चिटणीस यांनी महायुतीचे व जनतेचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.
