भरधाव दुचाकी आपसात धड़कल्या...धडकेत दोघांचा मृत्यू...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परतवाडा घटांग बुरडघाटजवळ दुपारी १२ चे सुमारारास दोन दुचाकीच्या धडकेने झालेल्या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघात महिलेवर शहरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कळते. सदर दुर्घघटना मंगळवार, १० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारणी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली आहे.या अपघातात गजानन शनवारे (३५) रा. घाटलाडकी, चांदूरबाजार व अजय जामूनकर (३०) रा. भुलोरी, चिखलदरा अशी मृतकांची नावे आहेत. गजानन शनवारे हे दुचाकी क्रमांक एमएच २७ बीए ७८४९ ने वृद्धेसह चिखलदरा तालुक्यातील मुसंडी येथे जवळच्या नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी जात असता अजय जामूनकर हे दुचाकी क्रमांक एमएच २७ डीएफ ०१३६ ने विरुद्ध दिशेने जात होते. मार्गात श्रीकृष्ण मंदिराजवळ दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गजानन शनवारे व अजय जामूनकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. सदर भयावह अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर मृतकांच्या मृतदेहांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.