कोल्हटकर महाविद्यालयात आयोजित सॉफ्ट स्कील कार्यशाळेचा समारोप...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयांमध्ये आयोजित सॉफ्ट स्कील कार्यशाळेचा समारोप दिनांक 9 डिसेंबर रोजी पार पडला.या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी उपस्थित होते त्याचबरोबर व्यासपीठावर सॉफ्ट स्किल ट्रेनर डॉक्टर हर्षाली पाटील ,प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर, प्राध्यापक विनोद बावस्कर , प्राध्यापिका सौ नीलिमा भोपळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी हे होते आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर विचारांमध्ये मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परंपरागत विषयांबरोबरच सॉफ्ट स्किल आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.आपल्या प्रास्ताविकातुन डॉक्टर निंबाळकर यांनी सहा डिसेंबर पासून चालू झालेल्या सॉफ्ट स्कील मार्गदर्शन कार्यशाळेचा आढावा घेतला, तर सहभागी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून कुमारी कीर्ती दाभाडे यांनी आपले विचार मांडले... अध्यक्षीय भाषणाने या कार्यशाळेची सांगता झाली...