आसलगाव बाजारात येणाऱ्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यास दोघांनी लुटले..६लाख८० हजारांचे सोने केले लंपास...
अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून दिवसाढवळ्या नागरिकांना अडवून व मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज हे चोरटे लंपास करत आहेत. मागील आठवड्यामध्ये सुद्धा खेरडा खुर्द व वडगाव पाटण येथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मोटरसायकल स्वारांनी जबरदस्ती चोरून नेले व तसेच दिनांक 17 डिसेंबर रोजी वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला आसलगाव धानोरा रोडवर एका दुचाकीवरून आलेल्या दोन इसमानी रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यास प्लास्टिकच्या दांड्याने मारहाण करून ६ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास केले.. त्यामुळे जळगाव जामोद पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.वडोदा येथील व्यापारी स्वप्निल प्रदीप कर्हे वय ३४ वर्ष व मधुकर उखर्डा वय ७० असे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एक्स ९८०९ हे सोन्या चांदीचे दागिने घेऊन आसलगाव बाजारा करिता येत होते. अंदाजे १०: ४५ च्या सुमारास आसलगाव जवळील धानोरा महासिद्ध जाणाऱ्या रस्त्याजवळ गाडी मागून एक मोटरसायकलवर दोन इसमानी येऊन मोटरसायकलला ओव्हरटेक केले त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या हातात येईल प्लास्टिकचा फावड्याचा दांडा मोटरसायकल चालक स्वप्निल कर्हे यांच्या तोंडावर मारला त्यामुळे गाडीचा तोल जाऊन गाडी खाली पडली त्यानंतर त्यातील एक इसम ज्याच्या अंगात आकाश रंगाचे टी-शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट वय अंदाचे ३५ हा धावत आमच्या पडलेल्या गाडीकडे येऊन मधुकर लुले यांना हातातील दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली मधुकर लुले यांना पाठवताना मारला तसेच स्वप्निल कर्हे यांच्या उजव्या हातावर व कमरेवर दांडा मारला त्याच्या हातातील दांडा फिर्यादी स्वप्निल कर्हे यांनी पकडून हिसकावून घेतला व तेथेच टाकला तेवढ्यात त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने द्या गोठा असे बोलल्याने गाडी चालवत असलेला अंगात काळ्या रंगाचे जॅकेट असलेला सडपातळ बांध्याचा इसम फिर्यादीकडे धावत आला व त्याने मधुकरुले याच्या हातातील बॅग हिसकावून तेथून त्या दोन्हीही चोरट्यांनी पळ काढला. त्या बॅगेमध्ये फिर्यादी स्वप्निल कर्हे यांचे सोन्याचे कानातील रिंग, जे टॉप्स, कर्णफुले वजन २५ ग्रँम, सोन्याचे मनी ज्यामध्ये गहूमणी, गोलमणी, नक्षीमणी, पैलूमनी, फुटबॉलमनी वजन २० ग्रॅम सोन्याचे बायतिळ्याच्या वस्तू वजन २० ग्रॅम तसेच चांदीच्या तोरड्या चाळ फॅन्सी तोरड्या गळ्यातील गोफ, जोडवे कडे, अंगठ्या वजन अंदाजे ३ किलो व नगद ५००००, दागिन्यांच्या पावत्या ज्यामध्ये सोन्याचे दागिने ९० ग्रॅम प्रति ग्रॅम ५००० प्रमाणे चार लाख पन्नास हजार, व चांदीचे एकूण वजन तीन किलो दागिने प्रति किलो ६० हजार प्रमाणे एक लाख ८० हजार रुपये व नगद पन्नास हजार रुपये असा एकूण सहा लाख ८० हजार रुपयांचा जवरीने चोरून त्यांच्याकडे असलेल्या एचएफ डीलक्स मोटर सायकल वर ठेवून निघून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सदर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वजी पानसरे, डीवाय एसपी, जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी स्वप्निल कर्हे व मधुकर लुले यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठविले. यावेळी फिर्यादी स्वप्नील कर्हे यांनी घटनेची फिर्याद दिली.. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी दोन्ही चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत.
