आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी.


 
आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी..

जळगाव जामोद प्रतिनिधी-

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत जळगाव जामोद शहरातील आदिवासी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दिनांक १२ डिसेंबर २०२४ पासुन १४ डिसेंबर २०२४ रोजी किन्हीराजा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे पार पडल्या. सदर स्पर्धेत खो-खोचा अंतिम सामना 17 वर्षीय मुले यांनी जिंकून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले तसेच. हॉलीबॉल चा अंतिम सामना जिंकून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे सचिन जमरा या विद्यार्थ्याने ३ हजार मीटर धावून प्रथम क्रमांक मिळविला तर प्रदीप बोंडळ १५०० मीटर मध्ये प्रथम क्रमांक तर वर्षा सस्त्या पंधराशे मीटर मध्ये द्वितीय क्रमांक, प्रदीप बोंडळ ८०० मीटर प्रथम, रश्मी मोहता ६०० मीटर प्रथम, आरती चंगळ ४०० मीटर प्रथम, नंदिनी जमरा २०० मीटर प्रथम, राकेश सोलंकी २०० मीटर प्रथम, गोपाळ डावर २०० मीटर प्रथम, नम्रता जमरा २०० मीटर प्रथम,४×१००रिले(१४ वर्ष मुले) प्रथम क्रमांक.४×१०० रिले मुली प्रथम क्रमांक. अशाप्रकारे प्रत्येक क्रीडा प्रकारात आश्रम शाळा जळगाव जामोद खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. सदर स्पर्धेत १००० खेळाडूंचा सहभाग होता. सर्व खेळाडूंनी अत्यंत चुरशीचा सामना खेळून सर्वांची मने जिंकली सर्व यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेच्या अध्यक्षा कुमारी अंजली दीदी टापरे स्नेहा ताई टापरे यांनी विद्यार्थ्यांची कौतुक करत पुढे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंचे कोच श्री देशमुख सर, श्री तडवी सर, भुमरे मॅडम यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.

Previous Post Next Post