खामगांव मतदार संघात २ वेळा कॅबीनेट मंत्रीपद..हा सन्मान आपल्या सगळयांच्या कुटूंबाचा आपल्या एकीचा निष्ठेचा भाजपा कुटूंबाचा सन्मान- ॲड आकाश फुंडकर कामगार मंत्री..


 
खामगांव मतदार संघात २ वेळा कॅबीनेट मंत्रीपद..हा सन्मान आपल्या सगळयांच्या कुटूंबाचा आपल्या एकीचा निष्ठेचा भाजपा कुटूंबाचा सन्मान- ॲड आकाश फुंडकर कामगार मंत्री

राजेश बाठे/संपादक आर सी २४ न्युज नेटवर्क...

खामगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ॲड आकाश फुंडकर यांची कॅबीनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खामगांव भारतीय जनता पार्टी खामगांवच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी खामगांव शहरात प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली संपुर्ण खामगांव शहर भाजपामय झाले होते. यावेळी सत्कार सभेस संबोधीत करतांना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, हा सन्मान केवळ माझा नसुन आपल्या सगळयांच्या कुटूंबाचा, आपल्या निष्ठेचा, भाजपा कुटूंबाचा आहे.” खामगांव शहरात शेगांव नाका येथून सुरु झालेल्या सत्कार रॅलीत शहरातील चांदमारी,विकमसी चौक, लोकमान्य टिळक पुतळा, छत्रपति  शिवाजी महाराज पुतळा, जगदंबा चौक, महावीर चौक, फरशी, शहिद भगतसिंह चौक, एकबोटे चौक, टॉवर चौक, भाजपा कार्यालय, गांधी बगिचा, अकोला बाजार, या ठिकाणी मा.मंत्री आकाश फुंडकर यांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फटाक्यांची   आतिषबाजी,  पुष्प वर्षाव करण्यात आला तसेच माता भगिनींव्दारे ओवाळून आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या.  हजारो लोकांच्या प्रवाह या मार्गाने मार्ग क्रमण करीत होता.यावेळी टॉवर चौक येथे संपुर्ण फुंडकर कुटूंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सागरदादा फुंडकर यांनी भगवा दुपटटा घालून मंत्री आकाश फुंडकर यांनी आपला मोठया भावाप्रती आदर व्यक्त केला यावर सागरदादा यांनी ॲड आकाशदादा यांचे कपाळावर चुंबन घेऊन आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणा विजयाच्या घोषणा दिल्या.

___________________________________

सभा स्थळी माजी मंत्री संजय कुटे म्हणाले की, आकाश फुंडकर यांना नाही तर मलाच हे मंत्री पद मिळालेले आहे.  फुंडकर कुटूंबीयांचे व आमचे कौटुबिक संबंध आहेत.  यावेळी आकाश फुंडकर यांनी माजी मंत्री संजय कुटे यांचे आभार मानत मंत्री आकाशदादा फुंडकर यांनी त्यांचा मोठया भावाप्रमाणे व पाठीराखा म्हणून सदैव उभे आहेत त्यांबददल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच कामगार खाते हे जनसामान्याच्या प्रकाशात मा.माजी मंत्री संजयभाऊ कुटे यांनीच आणले असही यावेळी कामगार आकाश फुंडकर म्हणाले.

Previous Post Next Post