महासिध्द अर्बन बँकेच्या पिंपळगाव काळे येथे धान्य गोदामाचा उद्घाटन सोहळा संपन्न.विश्वसनियतीचे दुसरं नाव म्हणजे महासिध्द अर्बन"'-डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर'


 
महासिध्द अर्बन बँकेच्या पिंपळगाव काळे येथे धान्य गोदामाचा उद्घाटन सोहळा संपन्न.विश्वसनियतीचे दुसरं नाव म्हणजे महासिध्द अर्बन"'-डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर'

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

महासिद्ध अर्बन बँकेने जळगांव जा परिसरात विश्वास संपादन केलाय, लोकांची मने जिंकली म्हणूनच म्हटलं जाते नातं विश्वासाचं, नात आपुलकीचे असे उदगार महासिद्द अर्बनच्या गोदाम उदघाटन प्रसंगी महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ.सौ.स्वाती संदीप वाकेकर यांनी केलेत.यावेळी धान्य गोदामाचे उदघाटन साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.कृष्णरावजी इंगळे, मा.अध्यक्षा उर्मिलाताई इंगळे, महासिध्द अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, मा. अध्यक्ष भाऊसाहेब इंगळे, मा.अध्यक्ष रामदासजी वाकेकर, शाखाध्यक्ष संदीप उगले, वासुदेवराव भोपळे,  अनंता काळे, विश्वास पाटील, शैलेश दैया, सागर भैया, संचालक हुसेनजी डायमंड, राजाभाऊ कोकाटे,  शामभाऊ इंगळे,  पांडुरंग जी घोलप समाधान जी नेमाडे इ. उपस्थित होते.अध्यक्ष या नात्याने मला आनंद होत आहे की, महासिध्द अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ यांनी पाहीलेले स्वप्न पूर्णत्वास जात आहे. भाऊ यांनी लावलेले एक छोटसं  रोपट्याचं आज  वटवृक्षात रूपांतर होऊन सर्वसामान्य शेतकरी वर्गाला याचा निश्चितच भविष्यात लाभ मिळेल. याचाच एक भाग पिंपळगाव काळे येथे सुरू होत असलेले धान्य गोदाम.अल्पावधीतच भाऊंनी धान्य गोदाम बांधून सर्व व्यापारी, शेतकरी वर्ग यांच्या सेवेत आज उपलब्ध करून देणे हि भाऊंची दूरदृष्टीच! आपल्याला ती नेहमीच अनुभवयास मिळते. त्याचीच प्रचिती या धान्य गोदामाच्या रूपाने आज आपणास येत आहे.अत्याधुनिक प्रशस्त, भव्य दिव्य असे धान्य गोदाम, पिंपळगाव काळे ते कुऱ्हा रोड वर या धान्य गोदामाची आज सुरुवात होत आहे.या  धान्य गोदाम च्या उद्घाटन प्रसंगी मी अध्यक्ष या नात्याने सर्व शेतकरी आणि व्यापारी बांधवांचे  या ठिकाणी स्वागत करते व विनंती करते की एक वेळ अवश्य आपल्या धान्य गोदामला भेट द्या.आपल्या सर्वांच्या सहकार्याने पतसंस्थेचा आलेख हा चढता आहे असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णरावजी इंगळे यांनी केले.यावेळी भाऊसाहेब इंगळे यांनी महासिद्ध अर्बन बँकचा लेखा जोखा वाचला.यावेळी गजाननभाऊ तायडे, रामदास इंगळे, मनिष सातव, विजय बहादरे,  प्रमोद घुटे, अनंता झाल्टे, प्रमोद तीतरे, दिवाणसिंग भाऊ,  अनुप महाले, शालीग्राम भोपळे, श्रीकृष्ण वानखडे, महादेव घुटे, रामेश्वर कळसकार, विष्णू कळस्कार, निळकंठ उमाळे, दिपक मानकर, श्रीकांत वानखडे, बंडू आप्पा जामोदे , गजानन इंगळे , अशोक ताठे, कृष्णा भोपळे, निलेश भोपळे, प्रभाकर मानकर, ज्ञानेश्वर राजनकर, कैलास घुटे व महासिध्द अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष दाते यांनी केले.

Previous Post Next Post