कोल्हापूर येथे पैरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अलका चव्हाण यांनी रोप्य तसेच कांस्यपदक पटकावले...
मंगल काकडे/पिंपळगांव काळे प्रतिनिधी...
चौथ्या राज्यस्तरीय पैरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोल्हापूर येथे दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी पार पडल्या यामध्ये बुलढाणा जिल्ह्यच्या सारा ओलंपिक असोसिएशन तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अनुराधा सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली सात खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये पिंपळगाव काळे जि.प. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळे मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेविका अलका प्रशांत चव्हाण यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता यामध्ये त्यांनी एकूण तीन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून कौतुकास्पद कामगिरी कतर थाळी फेक मध्ये रोप्य पदक, गोळाफेक मध्ये कास्यपदक, तसेच भालाफेक मध्ये कास्यपदक असे तीन वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये एकूण तीन पदके पटकावून बुलढाणा जिल्ह्याला शोभेल अशी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. यातूनच त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, व यापेक्षा पण चांगली कामगिरी पुढील काळातही मी करेल व गोल्ड मेडल पटकावेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.यानिमित्ताने त्यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी. मंगेश मानकर अध्यक्ष, प्रमोद भोपळे उपाध्यक्ष, निलेश बहादरे सदस्य, पूजा दांडगे, तसेच मुख्याध्यापिका खळे मॅडम, रोहनकर मॅडम,पालवे मॅडम, तसेच शिक्षक विनोद सुरडकर या सर्वांची उपस्थिती होती.
