ओबीसींचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.न्यायप्रविष्ठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडविण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत,जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या निवडणुका तात्काळ घेण्यात यावा तसेच यापुढे ज्या कोणत्या निवडणुका घेतल्या जातील त्या सर्वा निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी ही या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव महेंद्र बोडखे यांच्यासह राजीव घुटे, ओ पी तायडे,प्रशांत वंडाळे,एडवोकेट संदीप मानकर, प्रकाश तायडे,संजय इंगळे,गजेंद्र सातव,शेख अन्सार शेख अब्दुल्ला,तुलाराम कापसे,मिलिंद नारनवरे,अनिल इंगळे,जयेश ठाकरे,पुष्पाराज मेश्राम,मिलिंद वानखडे,कृष्णा भोपळे,विनय भोपळे,सुरेश वानखडे इत्यादींची उपस्थिती होती.
