भाजपा जिल्हा कार्यालयात भारतरत्न पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन..
जळगाव जामोद प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये दिनांक २५ डिसेंबर रोजी भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम येथे पार पडला.सर्वप्रथम माजी शहराध्यक्ष अभिमन्यू भगत यांच्या हस्ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले यावेळी माजी नगराध्यक्ष रामदास बोंबटकार, भाजपा माजी शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, राजेश गोटेजा सर, माजी नगरसेवक कैलास डोबे, माजी नगरसेवक निलेश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष कैलास पाटील, डॉक्टर प्रकाश बगाडे,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस परीक्षीत ठाकरे,राजू हिस्सल, बाळू चव्हाण,रामा इंगळे,पांडुरंग मिसाळ, अशोक नानक्दे,शरद खवणे,शुभम चंडाले,प्रविण लोखंडे यांच्यासह बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
