साडेबारा वर्ष न्यायाची प्रतीक्षा केल्यानंतर कळमना सामूहिक हत्याकांडातील मोहिदीपूरच्या पंजाबने घेतला अखेरचा श्वास...


 
साडेबारा वर्ष न्यायाची प्रतीक्षा केल्यानंतर  कळमना सामूहिक हत्याकांडातील मोहिदीपूरच्या पंजाबने घेतला अखेरचा श्वास...

जळगाव (जामोद) प्रतिनिधी:-

सुमारे साडेबारा वर्षांपूर्वी नागपूर येथील कळमना, जरीपटका भागात मोहिदीपूर येथील चार जणांवर सामूहिक हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात केवळ वाचलेला एकमेव साक्षीदार म्हणजे पंजाबराव सोळंके हा होता. तो सुद्धा गंभीर जखमी होऊन अपंगत्वाचे जीवन आजपर्यंत जगत होता. आपला भाऊ आणि इतर सहकारी या जीवघेण्या हल्ल्यात मारले गेले. त्यांची निर्गुण हत्या झाली. ९ मे २०१२  रोजी झालेल्या हत्याकांड  प्रकरण न्यायालयात दाखल असून अद्याप पर्यंत ही केस बोर्डावर सुद्धा आली नाही. दिवंगतांना न्याय मिळेल या आशेवर पंजाब साडेबारा वर्ष जगला आणि त्यांनी डिसेंबर रोजी अखेरचा श्वास सोडला. पत्नी आधीच दिवंगत झाली होती. चार मुली आणि दोन मुले असे त्याला अपत्य आहेत.जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदीपूर येथे  नाथ जोगी समाज वास्तव्यात आहे. हा भटक्या विमुक्त समाज संपूर्ण राज्यभर देवाडिकांचे वेश परिधान करून भिक्षा मागण्याचे काम करते. भिक्षा मागूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राईनपाडा अरण इत्यादी सामू िक हत्याकांडात कित्येकांची बळी गेली. प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असले तरी अद्यापही एकाही प्रकरणाचा निकाल हाती आला नाही. 

•नागपूर हत्याकांडाची पार्श्वभूमी:-

९ मे २०१२ रोजी हसन दादाराव सोळंके सुपळा मगन नागनाथ ,पंजाबराव भिकाजी शिंदे आणि पंजाबराव लक्ष्मण सोळंके हे चौघेजणे जरीपटका कळमना भागात रामायणातील राम ,लक्ष्मण ,सीता, हनुमान अशी पात्रे परिधान करून भिक्षा मागत होती. स्थानिक नागरिकांना चोर दरोडेखोर असल्याचा संशय झाला आणि त्यांनी या सर्वांवर दगड विटांचा मारा केला आणि त्यातच गंभीर जखमी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकमेव पंजाब लक्ष्मण सोळंके हा त्या प्रकरणातील साक्षीदार आतापर्यंत जिवंत  राहला. आपल्या भावासह इतर तिघांना न्याय मिळेल या प्रतीक्षेत तो आतापर्यंत जगला. अपंगत्वाचे लाजीरवाणी जिवंत जगत होता.

•दिनांक २५डिसेंबर रोजी पंजाबराव अंत्यविधी ग्राम मोहिदीपूर येथे पार पडला. ह्यावेळी सर्व गावांने आक्रोश केला. पंजाबराव चा परिवार पोरका झाला. ही घटना घडली त्यावेळेस तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी ह्या चौघांच्याही परिवाराला दत्तक घेतले होते. घरकुल सह विविध योजनांमध्ये ह्या कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येक दिवाळी भाऊबीजेला प्रा.खडसे हे मोहिदीपूरला येऊन ह्या भटक्या विमुक्त परिवारासोबत दिवाळी साजरी करत होते आणि ही परंपरा अद्याप सुद्धा त्यांनी सुरू ठेवली आहे. घटना घडली तेव्हा केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांचे सह विविध नेते ,पदाधिकारी येथे येऊन गेले. या परिवारांचे सात्वन केले. मोठी आश्वासने दिली. परंतु कोणत्याच आश्वासनांची पूर्ती अद्याप झाली नाही हे या कुटुंबीयांचं दुर्दैव आहे. नाथ जोगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सोळंके, श्रीनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष भावलाल बाबर गुरुजी यांनी चौघांच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी विविध आंदोलने केली, परंतु अद्याप यांच्या आंदोलनाला कसलेही यश आलेले नाही, हे सुद्धा ह्या मृतकांच्या परिवाराचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

•प्रशासनाला माणुसकीची जाण नाही:- आपल्या तालुक्यातील चौघांवर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यात तिघांचा माणूस मृत्यू झाला आणि त्यातील पंजाब हा एक साडेबारा वर्ष मृत्यू वेळेवर होता. घटना घडली तेव्हा उपविभागीय अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी मंत्री प्रशासनातील बडे अधिकारी मोहीदीपूर गावात येऊन या सर्व कुटुंबियांचे सांत्वन करत होते. २५ डिसेंबर रोजी घटनेतील एकमेव आणि अखेरचा साक्षीदार पंजाबने जगाचा निरोप घेतला. सर्व गाव दुःखाच्या सागरात बुडाले होते. मात्र त्याचे अंत्ययात्रेत तालुक्याचा कोणताही अधिकारी आला नाही. उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, ठाणेदार या सर्वांनीच भटक्या विमुक्तांकडे पाठ फिरवली असे आजचे भीषण वास्तव आहे..

___________

Previous Post Next Post