अतिवृष्टी अपहार प्रकरणी तिघांना अटक.यामध्ये तहसीलदार शितल सोलाट यांना मुख्य आरोपी बनवा!गजानन वाघ तालुका प्रमुख शिवसेना (उबाठा)यांची मागणी...


 
अतिवृष्टी अपहार प्रकरणी तिघांना अटक.यामध्ये तहसीलदार शितल सोलाट यांना मुख्य आरोपी बनवा!गजानन वाघ तालुका प्रमुख शिवसेना (उबाठा)यांची मागणी...

अमोल दाभाडे:-कार्यकारी संपादक आर सी २४ न्युज..

२२जुलै २०२३ अतिवृष्टी कोट्यवधींच्या  शासकीय मदत घोटाळा प्रकरणात तलाठी बिलेवार व तलाठी माटे यांच्यासह संगणक परिचालक महादेव पाटील यांना बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी २५डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना तुरुंगवास सुनावला आहे .२२जुलै २०२३ अतिवृष्टी प्रकरणात जळगांव जामोद तालुक्यात अनेक बनावट शेतकरी दाखवून त्यांच्या नावे शासकीय मदतीची रक्कम अश्या बनावट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून कोटी रुपयांचा शासनाला गंडा लावण्यात आला. यावेळी भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येताच तत्कालीन तहसीलदार शितल सोलाट यांनी पोलिस स्टेशन जळगांव जामोद येथे तिघांविरुद्ध तक्रार दिली. तेव्हापासून आरोपी फरार झाले होते तसेच आरोपींनी नागपूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता अर्ज फेटाळल्यापासून आरोपी फरार होते. आरोपींना अटक करण्यासाठी बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना महिन्यांचा कालावधी लागला आहे.या गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी तहसीलदार शितल सोलाट यांना बनवा अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी केली आहे. तसेच गजानन वाघ यांनी सादर अपहार प्रकरणात असणारे दलाल, ग्रामीण भागातील आपले सरकार केंद्राचे काही संचालक यांना सुध्दा आरोपी करून अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली...

Previous Post Next Post