_व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आ. डॉ. संजय कुटे यांचा सत्कार...


 
_व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आ. डॉ. संजय कुटे यांचा सत्कार...

राजेश बाठे/संपादक आर सी २४ न्युज...

जळगाव (जामोद) मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार डॉ. संजय कुटे यांची पाचव्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवड झाली. दिनांक २९ डिसेंबर रोजी व्हाईस ऑफ मीडिया तालुका आणि शहर शाखेचे वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.


आमदार डॉ.संजय कुटे हे पत्रकारांच्या प्रश्नाबद्दल सातत्याने सजग आणि जागरुक असतात.पत्रकारांच्या विविध प्रश्नांविषयी आणि पत्रकार भवना विषयी सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. पत्रकार भवनासाठी योग्य ठिकाणी लवकरच जागा उपलब्ध करून देऊ पत्रकार भवन निर्मितीचा मार्ग सुकर करू असे आश्वासन त्यांनी यावेळी पत्रकारांना दिले.यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष गुलाबराव इंगळे, शहर अध्यक्ष राजेश बाठे, राजू वाढे,अनिल भगत, सागर झनके, महमंद फारुक,संजय दांडगे, गणेश गिर्हे,आकाश उमाळे,शमिमबापू देशमुख, मंगल काकडे,गोपाळ अवचार,मंगेश राजनकर,पितांबर वडोदकर, मनोज सनांनसे, गणेश भड,गजानन सोनटक्के, नागेश भटकर,राजकुमार भड,अशोक देशपांडे,किशोर दाताळकर,राहुल निर्मळ यांचे सह व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.सर्व पत्रकार बांधवांसोबत आमदार डॉ. संजय कुटे यांनी सकारात्मक चर्चा केली.ह्या वेळी निलेश शर्मा, नंदू तायडे, प्रकाश राऊत, बाळू कुटे यांची सुद्धा उपस्थिती होती.


Previous Post Next Post