अतिवृष्टी आर्थिक अपहार प्रकरणी तत्कालीन तहसिलदार शितल सोलट यांना मुख्य आरोपी करा-रा .यु .जिल्हाध्यक्ष पराग पाटील...



अतिवृष्टी आर्थिक अपहार प्रकरणी तत्कालीन तहसिलदार शितल सोलट  यांना मुख्य आरोपी करा-रा .यु .जिल्हाध्यक्ष पराग पाटील...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीपोटी रक्कम वाटण्याच्या अनुषंगाने मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांना हि आर्थिक मदत वाटप करत असताना ही मदत महसूल विभागामार्फत वाटप करण्यात येते. महसूल विभागामार्फत रीतसर पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनाच ती मदत मिळणे अपेक्षित असते. सोबतच त्या अतिवृष्टी नदिकाठावरील ज्या दुकानदाराचे नुकसान झाले त्यांना सुद्धा मदत मिळणे अपॆक्षित होते. परंतु तसें न होता तहसीलदार सौं. शीतल सोलाट  यांनी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांकडून आपल्या जवळील लोकांचे चुकीचे पंचनामे करून घेतले व ज्यांच्या नावावर शेती नाही अश्या काही लोकांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा केली. असे निदर्शनास येत आहे तसें पुरावे सुद्धा आमच्या कडे उपलब्ध आहेत. अतिवृष्टी नुकसानीच्या कोट्यावधी रुपयाच्या आर्थिक घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या तत्कालीन तहसीलदार शितल सोलाट यांना सुद्धा ह्या प्रकरणात आरोपी करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील अवचार यांनी केली आहे.वास्तविक सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम  डाटाएन्ट्री व वाटप यादी यांची फेरतपासणी करून थंब देण्याचा अधिकार हा तहसीलदार यांचा असतो. त्यामुळे या सर्व प्रकरनामध्ये महसूल कर्मचारांसोबत तहसीलदार ह्या सुद्धा तेवढ्याच दोषी आहेत. त्यामुळे तहसीलदार मॅडम यांना मुख्य आरोपी करून सदर प्रकरणाची निपक्षपने चौकशी करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे...

Previous Post Next Post