चारबन येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन...


 
चारबन येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

शिबिरातील विध्यार्थी यांनी आदिवासींचे जीवनशैली चा सखोल अभ्यास विध्यार्थी यांनी करावा व जीवनमान कसे उंचावेल याकरिता प्रयत्न करावेत असे उदगार आज राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उदघाटन प्रसंगी संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी केले.स्वातंत्र वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी व उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव (जा) व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर निमखेडी, चारबन व उमापूर येथे दिनांक 29 डिसेंबर 2024 ते 4 जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलाने सुरूवात करण्यात आली.याप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, संचालक डॉ.संदिपजी वाकेकर, संरपच संघटनेचे राजुभाऊ सित्रे, उमापुरच्या संरपच सौ.सुलभा रविंद्र वाघमारे, उदयसिंह पटेल,उपसरपंच ओंकार गौतम,देविदास डावर, साबीर भाई, रविंद्र वाघमारे, प्राचार्य.राहुल तायडे सर,उपप्राचार्य.चद्रशेखर भोपळे सर, प्रा.अविनाश आटोळे सर, प्रा.अनिकेत उमाळे सर ,प्रा.धर्माळ सर आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते..या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर प्रसंगी राजू शित्रे पाटील , उदयसिंह पटेल, देविदास डावर आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राहुल तायडे ,सुत्रसंचलन प्रा.जिवेश साळी व आभारप्रदर्शन प्रा.धर्माळ सर यांनी केले.सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते...

Previous Post Next Post