सिंदखेडराजा येथे ॲड सलीम बापूमिया पटेल यांना सेवा रत्न पुरस्कार..
मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील पारशी वैद्य येथील ॲड सलीम बापूमिया पटेल यांना २६ डिसेंबर २०२६ रोजी सिंदखेड राजा येथे अल्हाज असदबाबा मेमोरियल द्वारा सेवा रत्न पुरस्कार देण्यात आला.हजरत दस्तागीर बाबांच्या ४५ व्या वार्षिक उत्सवा निमित्त सिंदखेडराजा येथील प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यर्थ, हजरत गौस ए आझम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था सिंदखेड राजा व असनाज हेल्थकेयर एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील सेवा रत्न पुरस्कार ॲड सलीम बापुमिय पटेल यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आलेला आहे. जळगाव जामोद व नांदुरा तालुक्यातील ग्रामीण भागात सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून स्वबळावर केजी ते पीजी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणाऱ्या या शिक्षण महर्षीची दखल मुंबई निवासी कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर अमजद खान व त्यांच्या संस्थेने घेतली.सदर पुरस्कार विशेष आमंत्रित इंडोनेशियाचे एड्डी वाडोयो दक्षिण आफ्रिकेचे वाणिज्य राजदूत लुंगीले म्हालेला, कोरियाचे सुंग की पार्क, ओमानचे कन्सुल, उद्योजक गणपत कोठारी, नुरुद्दीन सेव वाला मुंबई, स्वामी देवेंद्र भाई महाराज जैन साधक, मौलाना कलबे रिजवी सचिव राष्ट्रीय ओलेमा परिषद दिल्ली, पिठाधीश्वर सुशील गोस्वामी महाराज राष्ट्रीय सचिव सर्व धर्म परिषद दिल्ली, मौलाना अहमद नक्षबंदी हैदराबाद नोबेल पुरस्कार नोमिनी चंद्रकला सिंग, डॉ सुकेश झंवर सीएमडी बुलढाणा अर्बन , यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजक सिंदखेडराजा निवासी डॉ अमजद खान पठाण, कर्करोग शास्त्रज्ञ मुंबई, यांनी सिंदखेड राजा परिसरातील गोरगरीब जनतेसाठी दोन दिवसीय मोफत कर्करोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन महाआरोग्य शिविर तथा विविध वैद्यकीय सेवांचे शिबिर लावून, भारतातील नामांकित विविध डॉक्टरांना बोलावून दहा हजार रुग्णांचे मोफत चेकअप औषधी व वैद्यकीय साहित्य देऊन सेवा केली.
