भंगार व्यापाऱ्याची ८ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक... जळगाव जामोद तालुक्यातील घटना...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यामध्ये भंगार व्यापाऱ्यांची ४ अनोळखी इसमानी फसवणूक केल्याची तक्रार १९ डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्यामध्ये फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या संबंधित घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशन ने अनेक वेळा प्रयत्न केले आहे परंतु काही बाहेरील राज्यांमधील भंगार व्यापारी या फसवणुकीचे बळी पडत आहेत. कामरेजगाम जिल्हा सुरत राज्य गुजरात येथील भंगार व्यापारी चिरागभाई सवजीभाई रानपरिया व त्यांचा व्यावसायिक मित्र हे जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम हनवतखेड येथे स्कँप भंगार माल घेण्यासाठी आले होते. त्यांना आरोपी अजय नामक इसम व त्याचे तीन साथीदार यांनी भंगार माल न देता न दाखवता भंगार व्यापारी चिरागभाई रानपरीया यांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला नगद रक्कम २५ हजार ७०० व बँक अकाउंट मधून ६ लाख ८९ हजार व आणखी काही रक्कम असे एकुण ८ लाख ४८ हजार सातशे रुपये दिले. परंतु संबंधित आरोपींनी भंगारचा माल न देता भंगार व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केली. सदर घटना १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास घडली. सदर घटनेची तक्रार भंगार व्यापारी चिरागभाई सवजीभाई रानपरिया यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली तक्रारीवरून आरोपी अजय व त्यांच्या तीन साथीदाराविरोधात कलम ३१८(४)३(५) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सरकटे करीत आहेत.
