महिलेशी जबरदस्ती करून शारीरिक संबंध प्रस्थापित,,,,पोलिसांनी केली आरोपीला अटक....


 
महिलेशी  जबरदस्ती करून शारीरिक संबंध प्रस्थापित,,,,पोलिसांनी केली आरोपीला अटक....

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्यातील  अंजनगाव सुर्जी  पोलीस स्टेशन ची धुरा  गेल्या काही महिन्यांपासून  ठाणेदार  प्रकाश अहिरे सांभाळत आहेत, पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे  महिलांनावर होणारा अत्याचार  थांबवण्याचा  ते ऑटोकाठ प्रयत्न करत आहेत.  परंतु  दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका महिलेवर जबरदस्ती करून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार १३ डिसेंबर रोजी ५:३० वाजता अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून   पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी ३५ वर्षीय महिला ही परिसरातील दुकानात काम करीत असून ती कामावरून परत घरी जात असताना घटनेतील आरोपी अविनाश हिवराये हा फिर्यादीला त्याच्या रुम जवळ भेटला व चहा पिण्यासाठी जबरदस्ती केली. यावर फिर्यादी हिने नकार दिला असता नमूद आरोपीने हात पकडुन फिर्यादीला रुम मध्ये ओढले, व तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापित केले. आणि कोणाला सांगितल्यास फिर्यादीच्या मुलाला व पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी हिने पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास अंजनगाव पोलीस करत आहेत.

Previous Post Next Post