ग्रामसेवक-नागरिकांत वैमनस्यातून 'फ्री स्टाईल हाणामारी...


 
ग्रामसेवक-नागरिकांत वैमनस्यातून 'फ्री स्टाईल हाणामारी...

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

पंचायत समिती कार्यालयात आलेल्या एका नागरिकासह सचिवांमध्ये सोमवारी सायंकाळी कार्यालय बाहेर जुन्या वादातून हाणामारी झाली. ती शिवीगाळ व हाणामारी पाहून बघ्यांची मोठी गर्दी तेथे जमली होती. यासंदर्भात परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.योगेश माहोरे असे ग्रामसेवकाचे नाव तर दिलीप धुर्वे (रा. काजलडोह) असे नागरिकाचे नाव आहे. गावातील विकासात्मक कामांसह इतर बाबींमध्ये धुर्वे हे धमकी देत असल्याचा आरोप ग्रामसेवकाचा आहे. तर ग्रामसेवकाकडे इतरही ग्रामपंचायतींचा प्रभार असून त्यामध्ये काही सरपंच, उपसरपंचांनी पेसा कायदा निधी व इतर बाबींमध्ये निधीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याच्या तक्रारी आहेत. काजलडोह येथे झालेला हा वाद त्यातून झाला. पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामसेवक व काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीमधील मासिक सभेत हा विषय काढला. त्यासाठी ग्रामसेवक योगेश माहोरे आले असता दिलीप धुर्वे तेथे उपस्थित होते. दोघांनी एकमेकांना पाहिले. कार्यालयाबाहेर त्यांच्यात लोंबाझोंबी झाली. त्यानंतर चिखलदरा पोलिसात दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली. त्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

__________________________________

एकमेकांवर फेकले दगड धोंडे

ही फ्री स्टाईल सुरू असताना सोमवार आठवड्याचा पहिला दिवस होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी व उपस्थितांची गर्दी होती. ग्रामसेवक आणि सदर इसमामध्ये सुरु असलेली लोंबाझोम्बी पाहून काही वेळाने दोघांनी विटा आणि दगड हातामध्ये घेतले एकमेकांवर भिरकावले परंतु दोघांचीही नेम चुकले त्यामुळे कोणी गंभीररित्या जखमी झाला नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोरंजन झाले यात कुणीच मधे पडण्याची हिंमत दाखविली नाही या फ्री स्टाईलची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Previous Post Next Post