श्रीकांत पाटील यांनी संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास लक्ष्य ४ अंतर्गत भारताची शिक्षणाच्या दिशेने भूमिका मांडली...


श्रीकांत पाटील यांनी संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास लक्ष्य ४ अंतर्गत भारताची शिक्षणाच्या दिशेने भूमिका मांडली...

आर सी २४ न्युज नेटवर्क...

 ७ डिसेंबर रोजी २१ एसटी डिजि स्किलझ ने संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास लक्ष्य ४ - गुणवत्ता शिक्षणावर आधारित आंतरराष्ट्रीय परस्परसंवाद बैठक आयोजित केली. या परस्परसंवादात मूळचे जळगाव येथून माध्यमिक शिक्षण न्यू ईरा हायस्कूल मधून घेतलेले सध्या स्थायिक नाशिकचे श्रीकांत पाटील, एका निर्यात उद्योगाचे संस्थापक तसेच गेल्या ५ वर्षांपासून भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये भारत भर काम करीत असून स्टार्टअप इंडियाचे अधिकृत मेंटॉर, युरोपियन युनिअन मध्ये मार्गदर्शक व युनाइटेड नॅशन ग्लोबल मार्केटप्लेस मध्ये सल्लगार कार्यरत असून यांनी भारतात शाश्वत शिक्षण कसे लागू केले जात आहे यावर या परिषदेत चर्चारंभ केला. श्रीकांत पाटील यांचे ध्येय नवीन स्टार्टअप्स, उद्योजक, निर्यातदार, जागतिक पुरवठा साखळी, तयार करणे,  उद्योगासाठी सरकारी अनुदान योजनांचे लाभ मिळवून देणे, महिला उद्योजकांना सशक्त बनवणे, आणि भारत सरकारच्या "विकसित भारत  २०४७" या मोहिमेमध्ये  उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आहे. श्रीकांत यांनी या परिषदेत भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शाश्वत शिक्षण, लिंग समानता आणि डिजिटलीकरण यावर भर दिला व भारत सरकारच्या प्रमुख योजनांचा उल्लेख केला, ज्यात स्वच्छ विद्यालय अभियान,बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, आणि स्वायम सारख्या डिजिटल शैक्षणिक उपक्रमांचा समावेश आहे. तसेच, त्यांनी शालेय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हिरव्या तंत्रज्ञानाचा वापर, सौर ऊर्जा आणि जल व्यवस्थापनावर चर्चा केली. श्रीकांत यांनी शाश्वत विकास लक्ष्य ४ च्या जागतिक अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्वही स्पष्ट केले. त्यांनी शाश्वत शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षण आणि ओपन एज्युकेशन रिसोर्सेस यांचा वापर सुचवला. या बैठकित फिनलंडच्या शिक्षणातील सर्वोत्तम प्रॅक्टिसेस आणि त्याच्या गोड वैशिष्ट्यांचीही चर्चा झाली.या आंतरराष्ट्रीय परस्परसंवादी बैठकीत विविध देशांतील नामांकित वक्ते उपस्थित होते, इंजि. श्रीकांत पाटील (भारत), डॉ. नेयरा रदवान (इजिप्त), डॉ उचे लिन ओकपाला (नायजेरिया), प्रो. नाडा रतकोविच कोव्हाचेविक (क्रोएशिया), मंसूर शाह (पाकिस्तान) आणि अँबे. मेहेरीन-मिया (द. आफ्रिका) यांचा समावेश होता. श्रीकांत पाटील यांनी भारतात शाश्वत विकास लक्ष्य ४ च्या अंमलबजावणीसाठी जागतिक नेत्यांना सहकार्याची विनंती केली आणि कोणत्याही संस्थेला मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले. श्रीकांत यांचे भारतातील व आंतरराष्ट्रीय पटलावरील कामगिरीबद्दल त्यांना सर्व मित्र आणि परिवारातर्फे शुभेच्या देण्यात येत आहे.

Previous Post Next Post