आजच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे काळाची गरज न्यायाधीश खारकर..डॉ. सौ.स्वाती केला यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध उपक्रम...


 
आजच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे काळाची गरज न्यायाधीश खारकर..डॉ. सौ.स्वाती केला यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध उपक्रम...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी 12 डिसेंबर रोजी कायदेविषयक शिबिराचे आयोजन डॉ. सौ. स्वाती केला यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते . यामध्ये स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश चंद्रमोहन थारकर यांनी विद्यार्थ्यांना चाईल्ड सेफ्टी अंतर्गत पोस्को कायद्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले .यावेळी . तसेच या शिबिरासाठी जळगाव जामोद तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड देवीदास खेर्डेकर , ॲड .करीम खान , ॲड मारोडे यांच्यासह शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे ,मनीषा म्हसाळ यांच्यासह शाळेचे शिक्षक व प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रमोहन खारकर यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण करण्यासंदर्भात कायदेविषयक मार्गदर्शन केले आज रोजी मुलींवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यासाठी आज विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे काळाची गरज आहे . विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट यातील फरक सहज ओळखता यावा यासाठी अशा कायदेविषयक शिबिरांचे आयोजन प्रत्येक शाळेमध्ये होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे यांनी व्यासपीठावरून बोलताना सांगितले .त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रम घेण्यात आल्या दुपारच्या सत्रात शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ स्वाती केला यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे आधारस्तंभ किसनलालजी केला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती डॉ. स्वाती केला ह्या शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर असतात त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती याप्रसंगी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे यांनी उपस्थितांना करून दिली .याप्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थितांनी डॉ. स्वाती केला यांच्या वाढदिवसानिमित्त शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post