इव्हीएम हटाओ - देश बचाओ !इव्हीएम हटाओ - संविधान बचाओ !!जळगांव जामोद मतदार संघ काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम विरोधात एल्गार...


 
इव्हीएम हटाओ - देश बचाओ !इव्हीएम हटाओ - संविधान बचाओ !!जळगांव जामोद मतदार संघ काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम विरोधात एल्गार...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक १३ डिसेंबर रोजी जळगांव जा मतदार संघातील ईव्हीएम विरोधात "स्वाक्षरी अभियान" सुरू करण्यात आले.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न मिळाल्याने राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असताना सुद्धा निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक असल्याचे दिसून आले.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या शेवटच्या तासांमध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ केल्याने या निकालावर शंका उपस्थित होते.या निवडणुकीत मतांची टक्केवारीतील तफावत अत्यंत चिंताजनक प्रकार आहे.  निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान झाले.दुसऱ्या दिवसी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.05 टक्के झाल्याचे सांगितले.यात एकुण 07.83 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसुन येते आहे, तब्बल 76 लाख मतांची ही वाढ असुन, मतदानाचा टक्का कसा वाढला ? असा प्रश्न निर्माण होतो आहे, त्याचमुळे ईव्हीएम संदर्भात साशंकता उपस्थित होते आहे.अशा परिस्थितीत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संविधान वाचविण्यासाठी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिके द्वारा मतदान घेण्याचा आग्रह धरला जात आहे.    यावेळी जळगांव जा मतदार संघात संग्रामपूर येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या स्वाक्षरी अभियानाला काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post