जळगाव जामोद तालुक्यात पळून जाण्याचे प्रमाण वाढले...आई वडिलांनी पाल्याकडे लक्ष देण्याची गरज...


 
जळगाव जामोद तालुक्यात पळून जाण्याचे प्रमाण वाढले...आई वडिलांनी पाल्याकडे लक्ष देण्याची गरज...

जळगाव जामोद प्रतिनिधी-:-- 

सध्या कडाक्याच्या थंडीत कडक कडक बातम्या ऐकायला येत आहेत....आभासी प्रेमाला कवटाळत मूल मुली प्रेमात आकंठ बुडताना दिसत आहेत....तालुक्यात अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.त्यामुळे,पालकांनो आपल्या पाल्याकडे वेळीच लक्ष द्या कारण तालुक्यात मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मुलगा मुलगी पळून गेल्यानंतर पालकाकडून फक्त पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणे एवढाच पर्याय उपलब्ध राहतो नंतर काही दिवसानंतर त्यांना माहित पडते की ती कोणासोबत पळून गेली . शहरात अनेक शिकवणी वर्ग आहेत आई-वडील आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी जीवाचे रानकरतात वारेमाप पैसे खर्च करून पाल्यांना घडवण्याचा प्रयत्न करतात परंतु काही पाल्य क्लासेस, कॉलेज शाळेला येऊन टवाळखोरी करत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात मुली पळून जाण्याच्या घटना घडत आहे तसेच मुली महिलांबाबत होत असलेल्या घटना पाहता पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता न करता येत नाही तालुक्यात काही महिन्यापासून मुली पळून जाण्याच्या घटना घडत आहे मुलगी पळून नेल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला येत आहे अशा तक्रारीचे प्रमाण वाढतच आहे हे पालकांसाठी चिंताजनक बाब आहे यातील अनेक प्रकरणे बदनामीच्या भीतीपोटी पोलीस स्टेशन पर्यंत येत नाहीत, कमाईचे कोणतेही साधन नसलेल्या मुलासोबत शिक्षण घेत असलेल्या मुली पळून जात आहे त्यांच्या भविष्याचा उदरनिर्वाहाची चिंता मात्र ते करत नाही त्यामुळे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Previous Post Next Post