बल्लारखेड येथील आदिवासी अन्याय थांबवा !आदिवासी संघटनाची निवेदनातुन मागणी...


 
बल्लारखेड येथील आदिवासी अन्याय थांबवा !आदिवासी संघटनाची निवेदनातुन मागणी...

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी....

आकोट तालुक्यातील सातपुड्यातुच्या कुशीत वसलेले ३०० लोकसंख्या असलेले बल्लाखेड हे कोरकू आदिवासिंचे गाव असुन जवळच असलेल्या प्रादेशिक वनविभाग १०३२ क्रमांकाच्या वनखंडातील वस्तापूर नियतक्षेत्रातील पांढराखळक वर्तुळात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाड्या अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील वन मजूरांना गस्तीवर असतांना वाघ मृत अवस्थेत आढळून आला होता. वनविभागाने तातडीने कारवाई करत या प्रकरणात बल्लारखेड गावतील काही संशयास्पद आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.गावकऱ्यांनी वनविभागाला तपासात सहकार्य केले आहे. माञ मागील काही दिवसांपासून वनविभागाने दडपशाही भुमिका घेत राञी बे राञी गावात येऊन दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रादेशिक वनविभाग अजनगांव याच्या कडून होताना दिसत आहे.वाटेल त्याला ताब्यात घेऊन जाणे मारहाण करणे आणुन सोडुन देणे असे बेकायदेशीर उद्योग सुरु आहेत. ८ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या दरम्यान अजनगांव वनविभागाचे पथक अचानक गावात आले या प्रकरणात गावकऱ्यांनी त्याना विनंती केली आम्ही आपणास सहकार्य करीत आहोत. माञ ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून आम्हाला प्राण्याचे अवयव दया नाहीतर तुम्हाला खुप भारी जाईल अशा धमक्या देत वाहन क्रमांक एम एच २७ एए ५३१ या वाहनांच्या कांचा फोडून बैलगाडी आडवी लावून गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा खोटा रिपोर्ट आकोट ग्रामीण पोलीसात दिला व गावात दहशत निर्माण करण्यासाठी पोलीसाचा मोठा फौजफाटा आणला होता वास्तविक गावकऱ्यांनी दगडफेक केली नाही तसेच मारहाण केली नाही यातील एकही वन अधिकारी कर्मचारी जखमी नाही असल्याचे दिसून येत आहे.

Previous Post Next Post