मोथा गावात जंतनाशक गोळ्यांचे वाटप..वंचित विद्यार्थ्यांना १० डिसेंबर रोजी पुन्हा गोळ्या होणार वाटप...
राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
जंतामुळे बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये अनिमियासह पोटाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते त्या पार्श्वभूमीवर जंतनाशक गोळी देण्याची विशेष मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबविली जाते.त्यानुसार ता. ४ डिसेंबर रोजी मोथा गावात जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले यावेळी मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले, आरोग्य सहायक अशोक सुरत्ने,आरोग्य सेवक प्रवीण निंभोरकर,आरोग्य सेविका प्रविणा धाकडे,हिना सौदागर, तालुक्का सुपरवायझर शेवंता खडके,आशा सुपरवायझर निगार शेख आशा सेविका शेवंता शेळके,अंगणवाडी सेविका झीमाय मोरले,अनिता कासदेकर उपस्थित होत्या.जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये अनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा धोका असतो त्या पार्श्वभूमीवर जंतनाशक गोळी देण्याची विशेष मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबविली जाते.त्यानुसार ता. ४ डिसेंबर रोजी मोथा गावात मोहिम पार पडली.तर वंचित विद्यार्थ्यांना १० डिसेंबर रोजी पुन्हा गोळ्या वाटप होणार आहे या मोहिमेतून मुला मुलींचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होते जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक मोहिमा घेतल्या जातात एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हाच मोहिमेचा मुख्य उद्देश आहे......
___________________
मुलांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम चार डिसेंम्बर रोजी राबविण्यात आली मात्र काही कारणास्तव वंचित विद्यार्थ्यांसाठी पुन्हा १० डिसेंबर रोजी मोहीम राबविण्यात येणार आहे :-डॉ नीता नागले,वैद्यकीय अधिकारी, मोथा उपकेंद्र