खामगाव अर्बन बँक शाखा शेगाव चा 54 वा वर्धापन दिन साजरा...


 
खामगाव अर्बन बँक शाखा शेगाव चा 54 वा  वर्धापन दिन साजरा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

खातेदारांचा गुलाब पुष्प देवून अध्यक्ष विजयजी पुंडे,शाखाधिकारी अजयजी माटे यांनी केला सन्मान.खामगाव अर्बन को-ऑप बँक शेगाव शाखेचा वर्धापन दिन दि. १० डिसेंबर २४ रोजी बँकेचे अध्यक्ष श्री. प्रा. विजयजी पुंडे सर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, याप्रसंगी संत गजानन महाराजांची आरती  नगरसंघचालक श्री.श्यामजी तेल्हारकर, तालुका संघचालक  श्री.श्रीरामजी पुंडे, उद्योजक श्री. रमेशजी भरतीया यांचे हस्ते करण्यात आली, यावेळी दोन गृह कर्ज प्रकरणे रु.35 लाख प्राप्त झाली असून 21 रिकरिंग डिपॉझिटची खाती, 5.00 लाख मुदती ठेव व 5 ए टी एम कार्ड वितरित करण्यात आले कार्यक्रमाला शाखा समिती सदस्य अनंता बोरसे,प्रकाश गोयनका, अनिल उंबरकर, सौ. कांचन ढगे,सभासद सुनिल भरतीया, आदित्य टिबडेवाल, ललित खंडेलवाल, ओंकार माहुले, दिनेश शिंदे माजी नगरसेवक,चंद्रकांत शिंदे,राजेंद्र खत्री, रविंद्र राऊत,मुख्य व्यवस्थापक संतोष जाधव उपस्थित होते, कार्यक्रमाचे यशस्वीते करीता शाखाधिकारी अजय माटे, अभिषेक नेवे, काशिनाथ घनोकार, संजय इंगळे,अनंत तिवडे, राजेंद्र जाधव, मनोज इंगळे, वैभव चेंडाळणे आदीनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post