बी. एस .पटेल इंग्लिश मीडियम स्कूल नांदुरा येथे विज्ञान प्रदर्शन...


 बी. एस .पटेल इंग्लिश मीडियम स्कूल नांदुरा येथे विज्ञान प्रदर्शन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित बी.एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल नांदुरामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सलीम बापुमीया पटेल सर, उपाध्यक्ष प्रा. कय्युम पटेल सर, माननीय  सिराजोद्दीन पटेल सर यांच्या मार्गदर्शनातून दिनांक 28 डिसेंबर २०२४ रोजी शनिवारी शाळा परिसरामध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय एडवोकेट सलीम बापूमिया पटेल सर तसेच सिराजोद्दीन  पटेल सर, सरपंच निलेश भोपळे सर  , रफिक देशमुख साहेब बि.एस. पटेल प्रायमरी स्कूल ची प्राचार्य  पल्लवी साबे तसेच शाळेतील शिक्षिका मीनाक्षी ढोले, रूपाली वरणकार ,अपर्णा वानखडे, हर्षदा भिसे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्वांचे सर्वांचे प्रेरणास्थान बापूमीया सिरजोद्दिन पटेल व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध प्रकारच्या उपकरणाचा चंद्रयान थ्री ,वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर प्युरिफायर  , ज्वालामुखी सोर्स ऑफ वॉटर.......समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपक्रमाबद्दलची  माहिती प्रमुख पाहुण्यांना तसेच आलेल्या पालकांना दिली दरम्यान प्रमुख अतिथी एडवोकेट सलीम पटेल सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल कौतुक करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला..

Previous Post Next Post