बागेश्वर धामचे धिरेंद्र महाराज शास्त्री यांनी घेतले शेगावात श्रींचे दर्शन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-
बागेश्वर धाम येथील धिरेंद्र महाराज शास्त्री यांनी आज 29 डिसेंबर रोजी संतनगरीत येऊन श्री गजानन महाराज यांनी श्रीचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. आज दुपारी 3.वाजताचे सुमारास माऊली कॉलेजच्या हेलीपॅडवर धिरेंद्र महाराज शास्त्री यांचे आगमन झाले. यावेळी ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी श्री.गजानन महाराज संस्थानला भेट दिली.श्रीं चे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित भक्तांसमोर श्री संत गजानन महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी असा जयघोष केला. संस्थांनच्या विश्वस्त मंडळींनी त्यांचा सत्कार करण्यात आला. धिरेंद्र महाराज यांनी संस्थांनच्या व्यवस्थापनाची माहिती जाणून घेत कार्यप्रणालीची प्रशंसा केली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्राचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर व माजी कामगार मंत्री लोकनेते डॉ. संजय श्रीराम कुटे यांनीही त्यांचे संस्थान परिसरात दर्शन घेतले.
