३१ डिसेंबरला मद्यपान करून धिंगाणा घालाल तर खबरदार...! ठाणेदार अमोल सांगळे


 
३१ डिसेंबरला मद्यपान करून धिंगाणा घालाल तर खबरदार...! ठाणेदार अमोल सांगळे 

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

नूतन वर्षाच्या स्वागताकरिता कित्येक नागरिक मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचू शकतो तसेच नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ही परिस्थिती रोखण्यासाठी जलंब पो.स्टे.चे ठाणेदार अमोल सांगळे हे ३१ डिसेंबर रोजी जलंब पो.स्टे हद्दीतील गावासह  खामगाव ते माटरगाव या रोडवर कडेकोट बंदोबस्त लावणार आहे..तसेच तळीरामांच्या पार्ट्यावर धाडी टाकून शोकिनावर कारवाई सुद्धा करणार आहे. रोडवर मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावरही कारवाई करण्यासाठी ठाणेदारांनी पोलीस पथकाची नेमणूक सुद्धा केली असल्याचे समजते. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाला तळीरामांनी जरा जपून अशी धास्ती निर्माण झाली आहे...

Previous Post Next Post