जळगाव जामोद येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर झेप...


 
जळगाव जामोद येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर झेप...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या वतीने राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ पर्यंत संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जळगाव जामोद शहरातील स्वर्गीय अजय टापरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरीच्या बळावर विजय संपादित करून नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली.सदर स्पर्धेत १४ वर्ष वयोगट मुले ४ बाय १०० रिले प्रकारात  गोपाल शंकर डावर ,अरुण चंद्रसिंग मोहटा, रामसिंग दुवरसिंग जमरा ,योगेश भांगडा जमरा या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला १७ वर्षे वयोगट मुली ४बाय १०० रिले प्रकारात कु वर्षा छत्तरसिंग सस्त्या, नम्रता रतन जमर, बली बाई रेशम खवचा, रेखा शंकर डावर यांनी द्वितीय क्रमांक पटकविला,  १४वर्ष  वयोगट मुली  ४०० मीटर धावणे कु. आरुषी  नवोदया चंगळ द्वितीय क्रमांक १४ वर्ष वयोगट मुली ८००मीटर धावणे कु. रेशमी कुवरसिंग मोहता हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. सदर विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झाल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे या यशाकरिता संस्थेच्या अध्यक्षा अंजली टापरे सचिव स्नेहाताई टापरे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुनिता डांगे प्राथमिक मुख्याध्यापक आर आर कुकडे व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेत स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांना कोच श्री दीपक देशमुख, श्री गोपाल पिंजरकर सर, कु गायत्री कुटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
Previous Post Next Post