त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयात महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
समता बहू.शिक्षण् प्रसारक मंडळ जळगाव जामोद द्वारा संचालित त्रिमूर्ती कला वाणिज्य क.महाविदयालया मध्ये राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी मानवंदना दिली.आणी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत देश घडविण्यासाठी सतत परिश्रम करण्याची शपथ घेतली.प्रा.आनंद धुंदाळे यांच्या मार्गदर्शनाखालि व प्राचार्य कु.विद्या काटले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कु.नेहा वाकोडे, कु.पायल इंगळे,कु.निकिता तायडे,कु.दर्शना निमकर्डे ,अनिकेत निंबाळकर,प्रशांत राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रा.कु सुप्रिया इंगळे,प्रा.कु.माहेश्वरी वाघमारे,प्रा.रवींद्र निमकर्डे,प्रा.योगेश वारूकार,प्रा.शरद गावंडे उपस्थित होते.