आडोळ बुद्रुक येथील ना. मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालयात महामानवास अभिवादन...


 
आडोळ बुद्रुक येथील ना. मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालयात महामानवास अभिवादन...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

ना. मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना + 2 आणि ना. मुकुल वासनिक विद्यालय आडोळ बु यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.जे.ठोंबरे व प्रमुख अतिथी म्हणून ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एस. धांडे उपस्थित होते. महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून विद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख कु. मोरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रमुख अतिथी प्रा. एम. एस. धांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकला. व्यासपीठावरील मान्यवर मनोहर पाचपोर यांनी भारतीय संविधान यावर आपले विचार व्यक्त केले. व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठोंबरे सर यांनी डॉ. आंबेडकर यांची शैक्षणिक व सामाजिक कार्य यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य कु. घरटे मॅडम कु.भिवटे मॅडम व बावस्कर सर व इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल राजवैद्य सर व आभार प्रदर्शन साटोटे सर यांनी केले.

Previous Post Next Post