बी एस पटेल महाविद्यालयामध्ये 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न...


 
बी एस पटेल महाविद्यालयामध्ये 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

पिंपळगाव काळे बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा काय्यूम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयामध्ये "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" वर आधारित स्कूल कनेक्ट 2.0 कार्यशाळा दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाली.या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख हे होते तर उद्घाटक म्हणून आदर्श महाविद्यालय हिंगोली येथील डॉ शत्रूगण जाधव हे होते.या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मास्टर ट्रेनर प्रा डॉ सुरज प्रसाद शुक्ला हे होते. त्यांनी आपल्या संबोधनामध्ये विद्यार्थ्यांना जुने शैक्षणिक धोरण व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये काय फरक आहे आणि काय बदल झाला, याची माहिती सांगितली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये रोजगारभिमुख शिक्षण आहे आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला वाणिज्य व विज्ञान विषयाचे सोबतच औद्योगिक क्षेत्रातील एखादा टेक्निकल आवडीचा विषय घेऊन शिकता येणार आहे असे सांगून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बरीच माहिती सांगितली.महाविद्यालयाने परिसरातील जिल्हा परिषद हायस्कूल , सरस्वती आश्रम शाळा, बाबासाहेब धाबेकर उर्दू हायस्कूल, पिंपळगाव काळे तसेच बापूमिया सिराजोद्दीन पटेल स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, बापूमिया सिराजोद्दीन पटेल हायस्कूल, हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल डे कॉलेज पिंपळगाव काळे नामदार मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालय आडोळ इत्यादी विद्यालयाला कनेक्ट करून घेतले. वरील कनेक्ट केलेल्या स्कूल मधील दहावी ते बारावी चे एकूण 280 विद्यार्थी उपस्थित होऊन त्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित वरील शाळेचे शिक्षक प्राचार्य डॉ शेख फराह प्राचार्य एम बी इंगळे, मुख्याध्यापक अजित तडवी, डे कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोएब श्री रेवस्कर , श्री खरात, श्री बारहाते, श्री परदेशी श्री अनिस श्री हनीफ हे होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी प्राचार्य डॉ शेख फराह यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा एम टी नेतनास्कर आय क्यू ए सी समन्वयक डॉ अझरुद्दीन काजी डॉ नूर मोहम्मद डॉ निखिल अग्रवाल डॉ चेतन पलन डॉ आनंद जाधव प्रा एम पी जांभळे प्रा नितीन आसोले प्रा प्राजक्ता बाठे डॉ शकील खान डॉ दिपाली सिरसाट प्रा जोया प्रा रिजवान श्री गजानन इंगळे गजानन भोपळे विशाल दाणे परेश अवचार अमोल देवकर सय्यद अफरोज आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post