समाजवादी पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचे जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
समाजवादी पक्षाचे बुलढाणा नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष सय्यद नफिस यांचे दिनांक २५ जानेवारीपासून जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या अगोदर सय्यद नफीस यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना निवेदन दिले होते.सदर निवेदनात जनसामान्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. जनहितार्थ असलेल्या आमच्या मागण्या मान्य न झाल्यात उपोषणाचा इशारा त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला होता. परंतु सय्यद नफीस यांनी केेलेल्या मागण्या नगरपरिषद प्रशासनाने मान्य केल्या नाहीत त्यानंतर आज समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी जळगाव जामोद नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग चार आणि पाच, सुभेदार पुरा आणि सुलतानपुरा, काझीपुरा येथे अंगणवाड्या सुरू करण्यात यावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी. सुलतान पुरा सुभेदार पुरा आणि काजीपुरा येथे नवीन पाण्याची पाईपलाईन टाकावी सुलतानपुरा आणि छोटी कबरस्थानच्या रस्त्यावरील हायमॉस्ट लाइटची व्यवस्था करावी. अशा विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी केल्या होत्या.
