तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहकार मधील विद्यार्थ्यांचे मॉडेल जिल्हास्तरावर...


 
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहकार मधील विद्यार्थ्यांचे मॉडेल जिल्हास्तरावर...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद मधील यश प्रवीण बोदडे, अभिषेक संजय पाटील या विद्यार्थ्यांच्या सायन्स मॉडेलची (E- Rain ) माध्यमिक गटातून तृतीय क्रमांक पटकावत, तसेच शिक्षकांची शैक्षणिक साधने यामध्ये प्राथमिक गटातून शाळेच्या सहा. शिक्षिका वैशाली संतोष केला यांनी गणितीय संकल्पना या विषयात द्वितीय क्रमांक तसेच शाळेचे सहा. शिक्षक नितीन अनंता बेंदरकार सर यांनी माध्यमिक गटातून वैज्ञानिक आकृत्यांची प्रतिकृती या विषयांत प्रथम क्रमांक पटकावत यांची जिल्हास्तरासाठी निवड. याचबरोबर विज्ञान मॉडेल साठी प्रथमिक गटातून कु. निराली निलेश बोराखडे वर्ग 7 वा. , देवेश नाजूकराव घाईट, अमित प्रमोद इंगळे वर्ग 8 वा. , माध्यमिक गटातून विगसपाल गणेश वानखडे वर्ग 9वा, तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.त्याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला, शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ.स्वातीताई किशोर केला मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक विनायक उमाळे सर, प्राचार्य विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यासाठी शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ.स्वातीताई केला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, शाळेचे विज्ञान शिक्षक नितीन बेंदरकार, वर्षा वंडाळे ,शुभांगी बैरागी , दिपाली ईश्वरे, वैशाली उमाळे, मीनाक्षी नागपुरे,वैष्णवी चतारे, उजाला राऊत, रूपाली बोदडे, वृषाली पाठक, अश्विनी भोजने यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post