जिवरक्षक दिपक सदाफळे "समाजवीर" पुरस्काराने सन्मानित..


 
जिवरक्षक दिपक सदाफळे "समाजवीर" पुरस्काराने सन्मानित..

अकोला जिल्हा प्रतिनिधी...

शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव  उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव 2024 अकोल्यातील नामांकित विविध संस्था संघटनांच्या आयोजित सोहळ्यात 25 वर्षात केलेल्या निस्वार्थपणे निरंतर अशा आपत्ती व्यवस्थापन सेवा,जिवरक्षक सेवा,रुग्णसेवा, सामाजिक सेवा कार्य,याची दखल घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जिल्हा अकोला महाराष्ट्र चे प्रमुख दिपक सदाफळे यांना माननिय जिल्हाधिकारी अजित कुंभार सर,शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर मॅडम,शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे प्राचार्य डाॅ.रामेश्वर भीसे सर,जय बजरंग व्यायाम शाळा कुंभारीचे संस्थापक अध्यक्ष श्री.नारायणराव गावंडे काका प्रभात चे संचालक मा. गजाननजी नारे सर आणी नारे मॅडम,तसेच संयोजक निमंत्रक श्री.बि.एस.देशमुख सर,सौ.इंदुताई देशमुख जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड_यांच्यासह यांचे हस्ते शाल श्रीफळ आणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजक संस्थाचे पदाधिकारी व सत्कार मुर्तीसह मिडीया क्षेत्रातील आणी विवीध क्षेत्रातील गनमान्य उपस्थित होते.विशेषतः या महोत्सवाला आपल्या वक्तव्य शैलीतुन रंगत आणण्यासाठी उत्कृष्ट सुत्र संचालनातुन प्रशांत भाऊ गावंडे आणी धनंजय भाऊ मिश्रा यांनी आपल्या संच्यालनातुन अकोल्यातील आपल्या कामातून इतिहास रचणारे सोबतच विविध क्षेत्रातील काम करणारे लोकांना टीपुन त्यांचे कार्याला गांभीर्य पुर्वक दिशा दीली हे सर्व शब्दा पलीकडील आहे आपल्या या भावरुपी शब्द रचनांना मानाचा सलाम आहे असे मत जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी व्यक्त केले.

Previous Post Next Post