केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांची लोणार सरोवरात स्वच्छता मोहीम...पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती उपक्रम...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद आणि वरवट बकाल चे अध्यक्ष मा. डॉ. किशोरजी केला सर व जळगाव जामोद विभागाच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती किशोर केला मॅडम , तसेच शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, प्राचार्य विनोद ईश्वरे, प्राचार्य योगेश घाटोळे , प्राचार्य राजेश लोहिया यांच्या संकल्पनेतून इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील लोणारच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराची ओळख करून देण्यासाठी... 11 जानेवारी 2025 रोजी शाळेच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते .त्या निमित्ताने त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी या पर्यावरण जनजागृती उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला... सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद आणि वरवट बकाल येथील 600 च्या वर विद्यार्थी व जवळपास 100 शिक्षकांसह लोणार सरोवर पाहण्यासाठी शाळेच्या 16 स्कूल बसेस हा प्रचंड असा ताफा लोणारला पोहचला. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा अर्बन परिवाराकडून एक अद्ययावत ॲम्बुलन्सची सुद्धा सुविधा करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात अतिशय शिस्त आणि शांततेत लोणार सरोवराचा ऐतिहासिक वारसा जाणून घेतला.... यादरम्यान विद्यार्थ्यांना लोणारच्या सरोवराची भौगोलिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि शास्त्रीय माहिती देण्यासाठी या ठिकाणी संस्थेने पाच गाईडस्ची सुद्धा व्यवस्था केली होती... याप्रसंगी गाईड्स ने दिलेल्या सर्वच माहितीचे अवलोकन करून विद्यार्थ्यांनी त्याच्या नोंदी करून घेतल्या.... 11 जानेवारीला पहाटे पाच वाजता शाळेतून लोणार सरोवासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांनी मार्गातील सुलतानपूर येथील सहकार विद्या मंदिराला भेट देऊन या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला... तर परतीच्या प्रवासामध्ये हिवरा आश्रम येथील पूजनीय शुकदास महाराजांच्या आश्रमाला भेट देऊन आश्रमातील विविध सोयी सुविधा तसेच आश्रमाचा इतिहास जाणून घेतला... नंतर बुलढाणा अर्बन परिवारातर्फे विद्यार्थ्यांसाठी उत्तम अशा भोजनाची व्यवस्था परतीच्या प्रवासात करण्यात आली .अतिशय शिस्त आणि शांततेने संपन्न झालेल्या सहलीसाठी शाळेतील पर्यवेक्षिका तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .शैक्षणिक सहलीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला....
