गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेत मकरसंक्रांत निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
दिनांक १४ जानेवारी २०२४रोजी सालाबादप्रमाणे गोपालकृष्ण गोरक्षण संस्था जळगांव जामोद येथे मकरसंक्रांत निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न झाला.गोपुजनासाठी सकाळी सहा वाजेपासून स्थानिक महिला व नागरिकांची आवागमन सुरु झाली.यावेळी कार्यक्रमासाठी विशेष अथिती म्हणून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे सर व तहसीलदार पवन पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यासोबत मंचावर दत्ता पाटील, किसनलाल केला,नवल भैया, अनिल जयस्वाल, डॉ शिरेकार होते, सर्व प्रथम संस्थेचे विधी सल्लागार ADV शशिकांत गुप्ता यांनी काळे साहेबांचा सत्कार केला तसेच गोविंद अग्रवाल, महेद्र पलन,ओम गांधी कृष्णाजी चांडक याच्या हस्ते इतर मान्यवरांचे स्वागत पुष्पहार देऊन संस्थेकडून करण्यात आले.ह्याप्रसंगी संचालक परेश भन्साली यांनी गोरक्षण संस्थेच्या कामकाज विषयी माहिती दिली. संस्थेची स्थापना १९०१ साली झालेली असून अंदाजे ३५० च्या वर भाकड व दुध न देणाऱ्या आणि वयोवृद्ध गोमाताचे संगोपन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.संस्थेकडे गोमातेसाठी तीन मोठे टीनशेड आहे,लहान वासरू व आजारी गोमाते साठी वेगळे स्वतंत्र शेड आहे.तसेच भरपूर चारा बसेल अशे मोठे चाराशेड आहे,संस्थेकडे गोमाते साठी प्राथमिक उपचार सुविधा आहे, शंभर गाईना परिक्रमा देता येईल.अशी व्यवस्था आहे. संस्थे चे कार्यालय इमारतीमध्ये दिंड्या व संतासाठी निवास सुविधा आहे.संस्थेची सुरवात हि शून्यातून सुरु होऊन आज रोजी ती भव्य दिव्य सरुपात भक्कमपने उभी आहे.संस्था धर्मदायुक्त कार्यालय बुलडाणा येथे रजिस्टर असून तेव्हा पासून मार्च २०२४ पर्यत चे संस्थेचे आँडीत झालेले आहे. संस्था प्राधान्याने दुध न देणाऱ्या,भाकड वयोवृद्ध तसेच कोनवाडा मार्फत व कत्तलीसाठी जाणाऱ्या पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या गोमातेचे संगोपन करून जीवदयचे कार्य करते संस्थेने मागील २० वर्षात गावात फिरून कधीही वर्गणी जमा केले नाही,तसेच या कामासाठी कोणाची नियुक्ती सुद्धा केलेली नाही.संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी संस्थेकडून कोणताही मानधन किवा भत्ता घेत नाही.उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी संस्थेचा कारोभर हा नेट निटका आहे असे सांगून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.तहसीलदार पवन पाटील साहेब व दत्ता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.मान्यवरांनी गोपूजन सोबत संस्थेची पाहणी सुद्धा केली, व गोमातेला गुळ, ढेप हिरवा चारा व पालेभाज्या देऊन गोपूजन केले त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष्य सुरेश मोदी व सर्व संचालकांनी मान्यवर व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.यावेळी डॉ संदीप वाकेकर, अर्जुन घोलप ,गोपाल टावरी, प्रमोद भंसाली,डॉ सीताराम गठ्ठाणी,कोकाटे सर,तुकाराम काळपांडे, पत्रकार अभिमन्यू भगत,अतुल सोलंकी , जितेश पलन शहरातील मान्यवर बहुसंख्य नागरिक बंधू भगिनी व पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी संस्थे कडून गोपूजनासाठी गूळ, ढेप, हिरवा भाजीपाला, डाळ, आणि हिरवा चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक व गोसेवकानी परिश्रम घेतले.
